पोरबंदर संस्थान
पोरबंदर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्वीच्या मुंबई इलाख्यातील एक संस्थान. क्षेत्रफळ १,६६२ चौ. किमी. लोकसंख्या १,४६,६४८ (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. २५ लाख. उत्तरेस नवानगर व पूर्व-दक्षिणेस जुनागढ ही संस्थाने आणि पश्चिमेस अरबी समुद्र यांनी ते सीमित झाले होते. संस्थानात १०६ खेडी असून चुन्याचा दगड, मीठ, तूप यांचा चांगला व्यापर होता.